धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव, सुनील गावसकरांनी सांगितले ‘ते’ कारण..

मुंबई । दोन दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आश्चर्याचा धक्का म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने महेंद्र सिंग धोनीला मार्गदर्शक म्हणून वर्ल्ड कप संघ व्यवस्थापनात सामिल केले आहे. यामुळे आता या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या निर्णयावर एक वेगळीच चिंता व्यक्त केली आहे. सुनील गावसकर यांनी माहिला मार्गदर्शक म्हणून निवडी बद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी कोच शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये संघ निवडी आणि डावपेच विषयी चर्चा करताना तणाव निर्माण होईल, असे म्हटले आहे.

तसेच त्यांनी शास्त्री आणि धोनीने मिळून काम करावे अशी आशाही व्यक्त केली आहे. आता प्रत्यक्षात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला आहे. २००४ मध्ये त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

तेव्हा मुख्य प्रशिक्षक जॉन राईट होते. त्यांना मी त्यांची जागा घेईल असे वाटत होते. मात्र तसे काही नव्हते. असे असले तरी धोनीचा टीमला नक्कीच फायदा होईल. यामुळे चाहते आनंदात आहेत. महेंद्र सिंग धोनी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच भारतीय संघाचा भाग असणार आहे.

त्याने भारताला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. यामुळे बीसीसीआयने त्याला मार्गदर्शकपदी रुजू केले आहे. त्याने भारताला दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत. बीसीसीआयने १५ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात आर अश्विनयाचे चार वर्षांनी संघात पुनरागमन झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.