टी-20 वर्ल्ड कपसाठी धोनीची निवड; ‘या’ खेळाडूने सांगीतले त्यामागील रजनीकांत कनेक्शन

मुंबई । काल टीम इंडियाची टी- 20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली. बीसीसीआयने बुधवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामुळे चाहत्यांना कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही याची उत्सुकता लागली होती. अखेर काल ही निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा देखील टीममध्ये मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्याचा टीमला नक्कीच फायदा होईल, टीम इंडियाला तो मार्गदर्शन करेल, आता ही स्पर्धा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामुळे सोशल नेटवर्किंगवर धोनीचीच अधिक चर्चा दिसून येत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने अगदी भन्नाट पद्धतीने धोनीची या आगळ्यावेगळ्या जबाबदारीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन केले आहे. यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. या ट्विटमधून जाफरने धोनीच्या या सिलेक्शनमागील रजनीकांत कनेक्शनवर भाष्य केले आहे.

वसीम जाफरने एक रजनीकांतचे भन्नाट मीम शेअर केले आहे. शिवाजी द बॉस या चित्रपटामधील रजनीकांतचा ‘क्यो हिला डाला ना’ हा फोनवरील संवाद साधतानाचा फोटो जाफरने ट्विट केला आहे. धोनीने अचानक भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये काही अशापद्धतीनेच एन्ट्री केलीय, अशा कॅप्शनसहीत जाफरने हा फोटो शेअर केला.

कोरोनामुळे ही स्पर्धा लांबली होती, आता १७ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. यामुळे या सामन्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे.

यामुळे याकडे आता सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे.

विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, के. एल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.