धोनीची टी- 20 वर्ल्ड कपसाठी निवड का केली? गौतम गंभीरने सांगितले सगळ्यांच्या मनातले ‘ते’ कारण..

मुंबई । क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे. असे असताना त्याची येणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्याचे चाहते खुश झाले आहेत. तो कधी मैदानावर येणार याकडे चाहत्यांचे लक्ष असते. या स्पर्धेत धोनी हा आता मार्गदर्शकाची भूमिका पार पडणार आहे.

मात्र अचानक त्याची निवड कशी झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता गौतम गंभीरने यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला, कठीण दबावाच्या परिस्थितीत धोनीच्या रणनितीचा संघाला फायदा होईल. धोनीचा अनुभव आणि त्याची दबावातली आतापर्यंतची कामगिरी सरस आहे.

त्याला दबावात कशी परिस्थिती हाताळायची याची जाणीव आहे. त्याचे मेन्टॉर बनण्याचे मुख्य कारण हेच आहे की भारतीय संघाने दबावात असताना धोनीच्या कौशल्य आणि अनुभवाचा वापर करता यावे, त्याचा तोच रोल असेल, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारत महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, यामुळे आता अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरु शकतो, असेही तो म्हणाला. धोनीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देताना आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीज भारताला मिळवून दिल्यात.

त्याच्यामुळे आपल्या देशाला अनेक सोनेरी क्षण अनुभवायला मिळाले आहेत. आता मात्र त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो पुन्हा येणार आहे. आता तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल. यामुळे चाहते खुश आहेत.व

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.