..म्हणून धोनीला जगातील सर्वोत्तम कर्णधार म्हणतात! धोनीने रिव्ह्यू घेतला आणि फलंदाज तंबूत परतला, पहा व्हिडिओ

आयपीएलला थरात सध्या पुन्हा एकदा सुरू झाला आहे. असे असताना पहिला सामना हा चेन्नई आणि मुंबईमध्ये झाला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. २० धावांनी सामना जिंकत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विजयाची सुरूवात केली आहे. चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा केल्या.

या सामन्यात मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीची. कर्णधार धोनीने घेतलेल्या रिव्ह्यू सिस्टीमअंतर्गत पंचांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले आणि मुंबईला पहिला धक्का बसला. धोनीच्या या निर्णयामुळे क्विंटन डी कॉकला तंबूत परतावे लागले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दिपक चहरचा चेंडू खेळताना क्विटन डी कॉकच्या पॅडला चेंडू आदळला. अपिल केल्यानंतरही पंचांनी त्याला नाबाद ठरवले. मात्र धोनीने वेळ वाया न घालवता. डिआरएसची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी डीआरएसमध्ये तपासणी केली असता चेंडूचा बॅटचा स्पर्श न होता तो क्विटनच्या पॅड्सवर आदळल्याचे दिसून आले.

यामुळे धोनीच्या या निर्णयानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. धोनी हा डीआरएससंदर्भात अचुक निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. त्याचे हे निर्णय शक्यतो वाया जात नाहीत. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

सोशल मीडियावर सध्या धोनीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. याची निर्णय घेण्याची क्षमता देखील इतरांपेक्षा वेगळी आहे.

या व्हिडिओवर सध्या धोनीने रिव्ह्यू घेतला म्हणजे संपला विषय, DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टीम, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. धोनी हाच एक पंच आहे. त्याने निर्णय घेतला की निर्णय ठरलेला असतो, असे म्हणत अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.