क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता धोनी विकणार कोंबड्या

भारताच्या वतीने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर धोनीने एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्याने भारतीय क्रिकेटला भरभरून दिले आहे. पण निवृत्तीनंतर धोनी काय करणार? हा प्रश्न अनेकांना पडला होता.

यापुर्वी धोनीने शेतांमध्ये फळझाडांची जास्त लागवड केली होती. ही शेती सेंद्रीयपद्धतीने केली जाते. आता धोनी झाबुआ कडकनाथ कोंबड्यांचा व्यापार करणार असल्याचे समजले आहे. हा व्यापार धोनी रांची मध्ये करणार असून यासाठी धोनीने २ हजार पिलांसाठी पैसे भरून बुकिंग केले आहे.

कडकनाथ कोंबडीला आदिवासी भाषेत कालामासी म्हटले जाते. या पिलांच्या बुकिंगसाठी धोनीने झाबुआ येथील आदिवासी शेतकरी विनोद माडा यांच्याकडून पिले खरेदीसाठी पैसे दिले आहेत. यासाठी धोनीने त्याचा जुना मित्र पशुवैद्य कुल्डू यांची मदत घेतली आहे.

आदिवासी शेतकरी विनोद माडा ही पिले स्वतःच रांची येथे नेऊन देणार आहे. तसेच त्याला या ऑर्डरमुळे खूप आनंद झाला असून धोनीची भेट घेण्यास तो उत्सुक आहे. विनोदला १५ डिसेंबर पर्यंत ही दोन हजार पिले द्यायची आहेत.

कडकनाथ कोंबड्याच्या किमती सर्वसामान्य कोंबड्यांच्या तुलनेत तिपटीपेक्षा आधी असतात. तसेच याची अंडी ४० रुपयाला एक अशी मिळतात. आता धोनी या कोंबड्यांचा व्यापार करणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी धोनी काश्मीरमध्ये भारताच्या सेनेबरोबर राहीला होता. त्याचबरोबर भारताच्या मातीबद्दलही धोनीला प्रेम आहे. त्यामुळेच त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीकडे जवळपास ४० एकर एवढी शेती आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील छोटी सोनू आज झाली आहे मोठी; दिसते अतिशय ग्लॅमरस

शेतकऱ्यांची खरी कहाणी मांडणारा हा मेसेज वाचाच, तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल..

जामीनानंतर रिपब्लिक न्यूजरूममध्ये पत्रकारांनी केले अर्णबचे जंगी स्वागत; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.