जबरदस्त! धोनीने आपल्या नवीन घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं असेल? त्यासाठी पहा व्हिडिओ

मुंबई । टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे. धोनी सध्या रांचीच्या त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी स्वता सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसला, तरी त्याची पत्नी साक्षी अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेयर करते, ज्यात धोनी दिसत आहे.

साक्षीने शनिवारी असाच एक व्हिडिओ शेयर केला ज्यात धोनी आपल्या नव्या घोड्यासह धावताना दिसत आहे. साक्षीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि घोडा यांच्यात रेस सुरू असल्यासारखे वाटत आहे. मजबूत, जलद असे कॅप्शन साक्षीने या व्हिडिओला दिले आहे. तसेच तिने शेटलँड पोनी आणि रेसिंग असे हॅशटॅगही दिले.

धोनीने शेटलँड पोनी जातीचा घोडा स्कॉटलेडहून त्याच्या फार्महाऊसवर आणला असून, २ वर्षांचा हा घोडा जगातल्या सगळ्यात लहान जातीच्या घोड्यांपैकी एक आहे. या घोड्याची उंची ३ फूटांच्या आसपास असते. शेटलँड पोनी जातीचा घोडा त्याच्या वेगासाठी नाही, तर सजावटीसाठी ओळखला जातो. या घोड्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमतही खूप जास्त आहे. शेटलँड पोनी जातीचा हा घोडा धोनीच्या सिमलियातल्या घरी ठेवण्यात आला आहे.

धोनीकडे असलेला चेतक हा आणखी एक घोडा सॅम्बोमधल्या फार्म हाऊसमध्ये आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी या फार्म हाऊसवर आली होती, तेव्हाही तिने चेतकचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. धोनीच्या फार्म हाऊसवर आलेला पहिला घोडा चेतक आता ११ महिन्यांचा आहे.

हा घोडा मारवाडी जातीचा आहे. काळ्या रंगाचा असलेला चेतक त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. तर शेटलँड पोनी जातीचा घोडा पांढऱ्या रंगाचा आहे. तो देखील खास आणि आकर्षक आहे.

स्कॉटलंडवरून हा घोडा भारतात आणण्यासाठी धोनीने लाखो रुपये खर्च केले. धोनीच्या फार्महाऊसमध्ये सध्या हॉर्स रायडिंगची तयारी सुरू आहे. त्यामुळे ५ ते ६ घोडे बाहेरून मागवण्यात येणार आहेत. घोड्याच्यामुळे तरी धोनीच्या चाहत्यांना त्याची झलक पाहायला मिळते.

ताज्या बातम्या

दुर्दैवी! बहिणीने भावासाठी केलं होत यकृत दान, शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू

रोज सकाळी हा सोपा उपाय करा; पुरुषांच्या लैंगिक समस्या तत्काळ होतील दूर

याला म्हणत्यात जुगाड! धर्मेद्रच्या स्विमिंग पुलवरून प्रेरीत मुलांनी चालत्या ट्रॅक्टरमध्येच बनवला स्विमिंगपूल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.