धोनीची नवीन योजना! शेतकऱ्यांना देणार मोफत गाई, जाणून घ्या…

रांची । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरवर त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले.

आता धोनी लवकरच झारखंड मधील काही शेतकऱ्यांना मोफत गाई देणार असून या योजनेचे काम सुरु झाले असल्याचे समजते. रांचीमध्ये धोनीचे फार्म हाउस असून येथेच धोनी त्याचे शेतीचे स्वप्न साकार करत आहे.

धोनीला परदेशातील भरपूर दुध देणाऱ्या नवीन जातीच्या गाई शेतकऱ्यांना द्यायच्या आहेत. यामागे या गाईच्या दुध विक्रीतून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावे आणि त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी असा उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्याचा चांगला फायदा होणार आहे.

या संदर्भात धोनीने काहीही जाहीर घोषणा केलेली नाही मात्र त्याने जेव्हा जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्याच्या मनात ही कल्पना होती. आता ही कल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या शेतकऱ्यांना धोनी गाई देणार आहे. त्याची संपूर्ण माहिती, तसेच त्या गाईकडे धोनी स्वतः जाणून माहिती घेणार आहे. गाईची नीट निघा राखली जाणार नाही तेथील गाई तो परत घेऊन येणार आहे. सध्या त्याच्याकडे साहिवाल, पंजाब आणि काही स्थानिक जातीच्या १०५ गाई आहेत.

सध्या धोनीच्या शेतात शेती केली जाते. त्याच्या फार्मवरील टोमॅटो, फ्लॉवर आणि मटार सहा ठिकाणी सेंटर स्थापन करून तेथे विक्री केली जात आहे तसेच रोज ३०० लिटर दुध विकले जात आहे. फार्मवर मत्सपालन आणि कडकनाथ कोंबडी पालन सुद्धा केले जात आहे. याकडे त्याचे लक्ष असते.

गेल्या १ वर्षापासून धोनीच्या फार्मवर गाई पाळल्या जात आहेत. आता तो शेतकऱ्यांना गाई देणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लवकरच तो याबाबत योजना आखणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.