Share

मुंबईच्या ‘या’ खेळाडूच्या हुशारीसमोर धोनीही झाला फेल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

आयपीएलमधील २०२२ हंगामातील ५९ वा सामना मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये झाला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची अवस्था खूपच बिकट झाली होती.(Dhoni also failed in front of Mumbai’s ‘this’ player’s cleverness)

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ १०० धावा देखील करू शकला नाही. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाला संपूर्ण २० षटके देखील पूर्ण खेळता आली नाहीत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ १६ षटकात ९७ धावांवर बाद झाला होता. या सामन्यातील १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनी क्रीजवर उपस्थित होता.

त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने एका चेंडूवर स्ट्राइक बदलण्याचा निर्णय घेतला. पण धोनीचा तो निर्णय फसला. महेंद्रसिंग धोनीला तो चेंडू नीट खेळता आला नाही. तो चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला. पण तो चेंडू वाइड होता. मुंबई इंडियन्स संघाचा यष्टिरक्षक इशान किशनने तो चेंडू थेट विकेटवर थ्रो केला. चेंडू विकेटला लागला.

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू मुकेश चौधरी धावबाद झाला. या सामन्यात मुकेश चौधरीने ४ चेंडूंचा सामना करत केवळ ४ धावा केल्या. र वेळा आयपीएल ट्रॉफी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ केवळ १०० धावांत गारद झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

त्याने ३५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीच्या या खेळीचा चेन्नई सुपर किंग्सला काहीही फायदा झाला नाही. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा युवा गोलंदाज डॅनियल सॅम्सने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ १६ धावा दिल्या आणि 3 बळी घेतले.

या सामन्यातील पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघ देखील आयपीलच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. त्या सामन्यात धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला होता.

महत्वाच्या बातम्या :-
महेशबाबूने करून दाखवलं! सराकरूने पहील्याच दिवशी कमावले ५० कोटी; परदेशातही धमाकेदार ओपनींग
अजब प्रेम की गजब कहाणी! नागिणीच्या मृत्युनंतर नागाला बसला धक्का, केलं असं काही की…
विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ, आता समाजातून पडतेय कौतूकाची थाप

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now