Share

धर्मेंद्र हॉस्पिटलमधून परतले घरी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘मी धडा शिकलोय, तुम्ही ‘ही’ चूक करू नका’

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८६ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. अहवालानुसार, त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु आज सकाळी बाहेर काढण्यात आले आणि आता ते पूर्वीपेक्षा बरे आहे.(dharmendra-returns-home-from-hospital-sharing-the-video)

त्यांच्या तब्येतीची माहिती कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिली आहे की, ‘धर्मेंद्र जी काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण आता ते हळूहळू बरे होत आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून एक-दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येईल.

काळजी करण्यासारखे काही नाही.’ सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मेंद्र घरी आले असून त्यांनी स्वत: व्हिडिओ शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. अभिनेता धर्मेंद्रने त्यांच्या  ट्विटर हँडलवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आणि तो शेअर करताना त्याने लिहिले, ‘मित्रांनो, मी एक धडा शिकलो आहे’.

त्यांनी व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाले, “मित्रांनो, काहीही जास्त करू नका, मी केले आणि सहन केले,  धर्मेंद्र पुढे सांगतात की, पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले, दोन-चार दिवस कठीण होते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे, काळजी करू नका मी आता खूप काळजी घेत आहे… लव यू ऑल.”

बॉलीवूडचा हि-मॅन म्हटला जाणारा अभिनेता धर्मेंद्र वयाच्या या टप्प्यावरही काम करत असून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. तो पुढे करण जोहरच्या रॉकी और रानी की लव्हस्टोरीमध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
लव्ह ट्राएंगलमधून भयानक प्रकरण आले समोर, गर्भवती पत्नीलाच पेट्रोल टाकून जाळले अन्…
भोंगे हटवण्यासाठी मनसेनं उचललं ‘हे’ डिजिटल पाऊल, ठाकरे सरकारची करणार कोंडी
पोलिसांसमोर पळून जाणं संदीप देशपांडेंना पडणार महागात, गृहमंत्रालयाने दिले ‘हे’ आदेश
…त्यामुळे त्याला सकृतदर्शनी बलात्कार म्हणता येणार नाही, न्यायालयाने गणेश नाईकांना दिला अटकपूर्व जामीन

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now