काँग्रेसच्या सरकारमुळेच भारतातील पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये रोज लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बऱ्याच शहरांमध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंधनांनी १०० रुपयांचा आकडा पार केला आहे. या दरवाढीमुळे केंद्र सरकारवर टिका केली जात आहे.

अशातच केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी युपीए सरकारवर आरोप केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीला युपीए सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसने २०१४ पुर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आम्हाला मुळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे प्रमुख कारण आहे, असे प्रधान यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्याला आवश्यक असणारे ८० टक्के तेल बाहेरुन आयत करावे लागते, असेही प्रधान यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी एएनआयला मुलाखत दिली होती, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलद्वारे मिळालेल्या करांचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी, रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि विकास कामांसाठी करत आहे, असेही प्रधान यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

दरम्यान, फेब्रुवारीपासून वाहनांच्या किंमतीमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परीणाम देशांतर्गत इंधनाच्या दरावर झाला आहे. त्यातले महत्वाची कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही लादलेला करांचा दर उच्च आहे.

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, ‘या’ आमदाराची झाली निवड
नागपुरमध्ये मित्राने केली फिल्मी स्टाईलमध्ये तरुणाची हत्या; हत्येचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल
VIDEO: पाठकबाईचा राऊडी अंदाज; बुलेटसोबत केले ‘असे’ काही की चाहते झाले हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.