नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक ड्रिंक करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्रच्या नावाचा समावेश होतो. अभिनेते धर्मेंद्र दारुचे खुप वेडे आहेत. ड्रिंक केल्यानंतर त्यांना सांभाळणे खुप कठिण आहे. त्यामूळे बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये त्यांनी गोंधळ केला आहे.

असाच काही किस्सा ८० च्या दशकामध्ये झाला होता. १९८० मध्ये धर्मेंद्रने ऋषी आणि नीतू सिंगच्या लग्नात दारु पिऊन चांगलाच गोंधळ केला होता. त्यांच्या गोंधळामूळे पार्टीतील सर्व लोकं परेशान झाले होते.

१९८० मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंगच्या लग्नाची पार्टी होती. बॉलीवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांना या पार्टीमध्ये बोलावण्यात आले होते. अभिनेते धर्मेंद्रला देखील पार्टीचे निमंत्रण होते. त्यांना त्यांच्या सगळ्या कुटूंबासोबत पार्टीमध्ये बोलावण्यात आले होते.

धर्मेंद्र पार्टी सुरु होण्याअगोदरच पार्टीमध्ये गेले. त्यांना पाहील्यानंतर कपूर कुटूंबाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना प्यायला पाणी दिले. पण धर्मेंद्रने मात्र पाण्याच्या जागी दारुचा ग्लास उचलला. त्यांनी ड्रिंक करायला सुरुवात केली.

राज कूपरने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकत नव्हते. त्यामूळे कोणीही त्यांना काहीही बोलले नाही. राज कपूर तिथून निघून गेले. पार्टीतील एका वेटरने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा झाला नाही. धर्मेंद्रने पार्टी सुरु होईपर्यंत खुप जास्त ड्रिंक केली होती.

पार्टी सुरु झाल्यानंतर धर्मेंद्र नक्कीच काही तरी गडबड करतील अशी भीती कपूर कुटूंबाला वाटत होती. म्हणून त्यांनी धर्मेंद्रवर नजर ठेवण्यासाठी दोन वेटर पाठवले. पार्टीमध्ये अनेक मोठे कलाकार,, बिजनेस मॅन आणि राजकारणी त्यांच्या कुटूंबासोबत आले होते.

महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते त्यांच्या कुटूंबासोबत पार्टीमध्ये आले होते. एका मंत्र्याची पत्नी धर्मेंद्रची खुप मोठी फॅन होती. त्यामूळे त्यांनी धर्मेंद्रला पार्टीमध्ये बघून त्यांना भेटण्याची इच्छा जाहीर केली. त्या धर्मेंद्रशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या. त्यांनी धर्मेंद्रला विचारपूस करायला सुरुवात केली.

पण नशेत धुंद असलेल्या धर्मेंद्रने त्यांना पाहील्यानंतर त्यांच्याशी फ्लर्ट करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी मंत्र्याच्या पत्नीला जबरदस्ती किस करायला सुरुवात केली. धर्मेंद्रच्या वागणे पाहून त्या मंत्र्याच्या पत्नीने तिच्या बॉडीगार्डला बोलावले. त्यामूळे सगळ्या पार्टीमध्ये गोंधळ सुरु झाला होता.

शत्रूघन हे सगळं बघत होते. धर्मेंद्र खुप नशेत आहेत ही गोष्ट त्यांना समजली. त्यामूळे त्यांनी गडबडीत धर्मेंद्रला पार्टीच्या बाहेर नेले. त्यांनी ड्रायव्हरला धर्मेंद्रला घरा सोडायला सांगितले. धर्मेंद्रला सोडून ते पार्टीमध्ये परत आले आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार राज कपूरला सांगितला.

राज कपूरने सगळी परिस्थिती सांभाळून घेतली. नाही तर त्या दिवशी धर्मेंद्रने मार खाल्ला असता. त्यावेळेस बॉलीवूडमध्ये या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती. धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला जबरदस्ती किस केले. अनेक वृत्तपत्रांनी ही बातमी छापली होती. पण नशेत धुंद असलेल्या धर्मेंद्रला दुसऱ्या दिवशी काहीह आठवत नव्हते.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?

आई झाल्यानंतर ‘तारक मेहता’मधील रिटा रिपोटरने पोस्ट केले बिकनीतील फोटो; फोटोसोबत दिला खास संदेश

प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर लावली आग; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.