याला म्हणत्यात जुगाड! धर्मेद्रच्या स्विमिंग पुलवरून प्रेरीत मुलांनी चालत्या ट्रॅक्टरमध्येच बनवला स्विमिंगपूल

बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्रने आपल्या अद्भुत अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ते केवळ ६० च्या दशकातच नव्हे तर आजही ते ‘मॅन’ म्हणून ओळखला जात आहे. धर्मेंद्र वयाच्या ८५ व्या वर्षीदेखील सोशल मीडियामध्ये खूप सक्रिय असतात.

सध्या कोरोना महामारीमुळे धर्मेंद्र मुंबईपासून दूर त्यांच्या लोणावळ्याच्या फार्महाउसवर राहत आहेत. त्यांचे फार्महाउस निसर्गाच्या कुशीत असल्याने अनेक नेत्रसुखद दृश्य पाहायला मिळतात. त्यामुळे धर्मेंद्र बऱ्याच वेळा सुंदर दृश्य फॅन्ससाठी सोशल मिडीयावर शेअर करत असतात.

धर्मेंद्र यांनी इतक्यातच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्विमिंग पूलमध्ये एरोबिक्स करताना दिसत आहे. धर्मेंद्र अद्याप किती फिट आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. त्यांच्या या व्हिडिओला फॅन्सकडून मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट्स मिळत आहेत.

त्याच्या या व्हिडिओला प्रेरित होवून पंजाबच्या दोन तरुणांनी चालत्या फिरत्या ट्रॅक्टरमध्ये स्विमिंग पूल तयार केला आहे. त्यात ते तरुण स्विमिंग करत आहे. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय.

पंजाबच्या हरिंदर उभी या फॅनने हा चालत्या ट्रॅक्टरमध्ये स्विमिंग पूल तयार केला आहे. हा ट्रॅक्टर गावात फिरत असून त्याच्या मागच्या ट्रोलीमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे स्विमिंग पूल असल्याचीच भावना हा ट्रॅक्टर पाहून येत आहे. त्या स्विमिंग पूल मध्ये दोन तरुण पोहण्याचा आंनद घेत आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना या तुरुणांनी लिहिले की, ‘धरमजी गावात आजकाल असे देशी स्विमिंग पूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.’ सध्या हा देशी स्विमिंग पूल सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे तसेच यावर अनेक मजेशीर कमेंट वाचायला मिळत आहे.

दरम्यान व्हिडिओसह धर्मेंद्र यांनी असे कॅप्शन देखील लिहिले आहे की, ‘मित्रांनो, तुमच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छा दिल्यामुळे मी योग आणि हलका व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे आणि एकत्र पाण्याचे एरोबिक्स देखील केले आहेत. निरंतर राहण्यासाठी उत्तम आरोग्य हेच वरदान आहे. आनंदी रहा, निरोगी रहा आणि सामर्थ्याने परिपूर्ण व्हा.

हे ही वाचा-

मुस्लिमांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तरच सामाजिक समस्यांवर तोडगा निघेल- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा

सोनम कपूरच्या लग्नात वडील अनिल कपूरला अश्रू झाले होते अनावर; रडत रडत केले होते मुलीला विदा

पुन्हा बरसात आहे मालिकेतून लाडकी जोडी मुक्ता बर्वे आणि उमेश कामत प्रेक्षकांच्या भेटीस;पहा प्रोमो व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.