सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांमध्ये भांडण होत असतात. पण कधी कधी दोन कलाकारांच्या भांडणामूळे त्यांच्या कुटूंबामध्ये देखील भांडण होते. बॉलीवूडमध्ये अशी भांडणं एकदा नाही तर अनेकदा झाली आहेत.

धर्मेंद्र आणि बोनी कपूरमध्ये देखील अशाच गोष्टीमूळे भांडण झाले होते. हे भांडण एवढे वाढले की, धर्मेंद्रने बोनी कपूरला मारण्याची धमकी दिली होती. दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे होते. त्यामूळे दोघांचे भांडण जास्त काळ लपून राहू शकले नाही. जाणून घेऊनया नक्की का झाले होते त्यांचे भांडण?

धर्मेंद्र त्यांचा मुलगा सनी देओलसाठी खुप भावनिक होते. सनीचे बॉलीवूडमध्ये चांगले करिअर व्हावे म्हणून ते नेहमी प्रयत्न करत होते. त्यांना मुलगा सनी देओल खुप चांगला अभिनेता वाटत होता. असेच काही बोनी कपूरचे होते.

बोनी कपूरला भाऊ अनिल कपूर खुप चांगला अभिनेता वाटत होता. त्यांना अनिलसमोर दुसरा कोणताही अभिनेता दिसत नव्हता. याच कारणामूळे धर्मेंद्र आणि बोनी कपूरमध्ये वाद होते. दोघांचे भांडण होत होते.

१९८९ मध्ये शेखर कपूरने अनिल आणि सनीला ‘जोशिले’ चित्रपटामध्ये घेतले. त्यामळे धर्मेंद्र आणि बोनीमधले तणाव वाढत गेले. चित्रपटाची शुटींग सुरु झाल्यानंतर दोघेही चित्रपटावर चांगलेच लक्ष ठेवून होते. अनेक वेळा ते चित्रपटाच्या सेटवर जायचे.

चित्रपटामध्ये अनिल आणि सनीला सनीला एकसारखा टाईम मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु होते. शुटींग सुरु असताना दोघांमध्ये खुप वाद व्हायचे. दिग्दर्शक देखील त्यांच्या स्वभावाला कंटाळले होते. असे करत करत शेवटी चित्रपटाची शुटींग पुर्ण झाली.

चित्रपट पुर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचे पोस्टर रिलीज केले. त्या पोस्टरमध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी अनिल कपूरचे नाव पहीले टाकले होते. तर सनी देओलचे नाव दुसऱ्या नंबरला टाकण्यात आले होते. हे पोस्टर पाहील्यानंतर धर्मेंद्र चिडले.

त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला यामागचे कारण विचारले. कोणाला विचारुन त्यांनी अनिलचे नाव पहीले टाकले? यावर शेखर कपूरने सांगितले की, त्यांनी बोनी कपूरच्या सांगण्यावरुन असे केले होते. हे ऐकताच धर्मेंद्र चिडले.

त्यांनी बोनी कपूरला फोन करुन मारण्याची धमकी दिली. भेटल्यानंतर दोघांमध्ये खुप जास्त भांडण होत होते. दोघांमधले भांडण खुप जास्त वाढत होते. हा नजारा पाहून दिग्दर्शकाने समजूतदारपणा दाखवला. त्यांनी धर्मेंद्रची समजूत काढली आणि त्यांचा राग कमी केला.

त्यांनी धर्मेंद्रला सांगितले की, ते दुसरे पोस्टर रिलीज करतील आणि त्यात सनी देओलचे नाव पहीले टाकतील. त्यांनी सनीच्या नावाचे पोस्टर रिलीज केले. त्यामूळे धर्मेंद्रचा राग थोडा कमी झाला. नाही तर त्या दिवशी त्यांनी बोनी कपूरची धुलाई करण्याची तयारी केली होती.

महत्वाच्या बातम्या –

१३ वर्ष मोठ्या आणि विवाहीत नसीरुद्दीनच्या प्रेमात पडल्या होत्या रत्ना पाठक

शशी कपूर आणि पत्नी जेनिफरचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल

ज्याने शुन्यातून स्टार बनवले; त्याला शेवटच्या दिवसांमध्ये भेटलेही नाहीत अमिताभ बच्चन

७० च्या दशकामध्ये ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीसोबत शशी कपूरने दिला होता पहीला न्यूड सीन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.