धर्मेद्र व हेमा मालिनी यांच्या नात्यात दुरावा? ‘या’ कारणामुळे वर्षभरापासून राहताहेत वेगळे

बॉलिवूडमध्ये अभिनेता धर्मेंद्र यांचे नाव आदराने घेतले जाते. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. तसेच ते वेगवेगळ्या मुद्यांवर आपली भुमिका मांडत असतात.

अशात गेल्या एक वर्षापासून धर्मेंद्र त्यांची पत्नी हेमा मालिनीयांच्यापासून लांब राहत आहे. ते गेल्या एकवर्षापासून एकमेकांना भेटलेले सुद्धा नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आता हेमा मालिने या प्रश्नावर मौन सोडले आहे.

हेमा मालिनी एका मुलाखतीत सांगितले आहे, की त्या धर्मेंद्रपासून का लांब राहत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आम्ही दोघेही विभक्त राहत आहोत, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

गेल्या एका वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांना वेगळे राहावे लागत आहे.असेच काहीसे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यासोबत झालेले आहे. कोरोनामुळे ते दोघेही एक वर्षभरापासून एकमेकांपासून दुर राहत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ते मुंबईपासून दुर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये राहत आहे.

सध्या धर्मेंद्र यांच्या सुरक्षितेसाठी फार्महाऊसवर राहणे चांगले आहे. आमच्या एकत्र राहण्यापेक्षा आम्ही त्यांच्या प्रकृतीला महत्व देतो. हा आपल्या सर्वांसाठी खुप कठिण काळ आहे. अशा परिस्थितीत आपले आरोग्य आपल्याला टिकवायचे असेल, तर आपल्याला मजबूत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला काही त्यागही करावे लागतात, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये धर्मेंद्र कोरोनाची लस घेताना दिसून येत होते. त्यामध्ये त्यांनी लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तसेच मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असेही धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्नाच्या दिवशी नवरीला आला नवरदेवाचा मॅसेज; मॅसेज वाचून नवरीचे अख्खे कुटुंबच हादरले
..म्हणून दुप्पट वय असलेल्या अभिनेत्यासोबतही रोमान्स करायला तयार होतात अभिनेत्री; कारण..
वाढदिवसाच्या एक दिवस आधीच झाला होता भुजिया किंगचा मृत्यु, वाचा त्यांच्याबद्दल १० गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.