मुंबई | ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे ५.३८ वाजता निधन झाले.
महाशय धर्मपाल गुलाटी हे कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषणने सन्मान केला होता.
‘एमडीएच’ कंपनीने चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठे जाळं एमडीएचने विस्तारलेले आहे.
गुलाटी यांचा जन्म २७ मार्च, १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. १९४७ च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ १५०० रुपये होते. तसेच त्यांनी भारतात आल्यावर उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले.
यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या एका दुकानावरून त्यांनी देशाची प्रसिद्ध कंपनी उभी केली. त्यांच्या आज एमडीएच कंपनीच्या केवळ भारतातच नाही तर दुबईतदेखील फॅक्टरी आहेत. त्यांच्या एकूण १८ फॅक्टरी आहेत. याद्वारे ते जगभरात पोहोचले आहेत. एमडीएचची ६२ उत्पादने आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
साराचा कि.सींग सिन पाहून वडील सैफ अली खानने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाला…
छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार डॉ. अमोल कोल्हे…
योगी आदित्यनाथ ‘ठग’! उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यावरून मनसे आक्रमक..