‘पुन्हा शेपमध्ये येण खरच अवघड आहे का? नुकतच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री कडगावकरने स्त्रियांना दिला मोलाचा सल्ला

झी मराठी वरील अश्या बऱ्याच मालिका आहेत ज्या बंद होऊन अनेक दिवस झाले आहे. असे असूनही त्या मालिकांबद्दलचे प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेले नाही. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल. या मालिकेतून अक्षया देवधर म्हणजेच पाठक बाई आणि हार्दिक जोशी म्हणजे आपला राणा दा यांना प्रचंड प्रेम मिळाल. तसेच याच मालिकेतील प्रचन गाजलेलं पात्र म्हणजे वहिनीसाहेब अर्थातच धनश्री काडगावकर.

Dhanshri Kadgaonkar Biography, Wiki, Birth Date, Age, Husband, Hot Images,  Crime Petrol, Family – AtoZ Marathi

धनश्रीने मालिकेत विरोधी भूमिका निभावली असली तरी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. ती काही दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. कारण काही दिवसांपूर्वीच ती आई बनली आहे. धनश्री टीव्ही पासून लांब असली तरी ती सोशल मिडीयावर सक्रीय असलेली पाहायला मिळते.

Dhanashri Kadgaonkar's hot Gym Workout Photoshoot - मराठीshoots

अभिनेत्री धनश्रीने नुकतेच तिचे काही फोटोसोशल मिडीयावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने नुकत्याच आई बनलेल्या स्त्रियांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आई बनल्यानंतर जे अनपेक्षित शारीरिक बदल होतात ते टाळण्यासाठी आणि  पुन्हा योग्य त्या आकारात येण्याबद्दल बोलताना दिसत आहे.

धनश्रीने तिच्या इंस्ताग्राम अकाऊटवर योगाचे फोटो शेअर करत आपल मत व्यक्त केले. तिने त्यामध्ये लिहिले आहे की, ‘हे कठीण आहे का? खरच आहे. परत शेप मध्ये ये खरोखर कठीण आहे. कधी कधी मी स्वतःला कमी लेखते. मला वाटत मी टोंड बॉडी गमावली आहे.

पुढे ती म्हणते, मी एका बाळाला जन्म दिला आहे परंतु हे त्यापेक्षा कठीण आहे. बाळापासून वेळ काढणे कठीण आहे, व्यायामासाठी वेळ काढणे कठीण आहे आणि झोपेसाठी तडजोड करणे कठीण आहे. पण मी हे करतीये आणि मला हे करायचं.

धनश्री पुढे म्हणते की, बाळाच फीडिंग, त्याच्या सोबत खेळण, त्याला झोपवण, त्याचे ढीगभर कपडे सुकायला टाकण, आणि तेवढेच कपडे घडी करून जागीच ठेवून देण, या सर्वानंतर झोपूया अस विचार करत असतानाच बाळ पुन्हा उठत. हे सगळ करणारी मी इकडे नाही, जगातील तमाम आई हे करतात.

धनश्री म्हणते यातून सुद्धा थोडा वेळ स्वतासाठी काढा आणि डॉक्टरांना विचारून तुमचा व्ययाम प्लान करा. खूप छान वाटेल. तुम्ही व्यायाम करा आणि मला सांगा कस वाटतंय? आणि हो कधी कधी चीट डेअसतोच की अस म्हणत तिने पोस्ट शेअर केली. चाहत्यांनी तिच्या पोस्टला भरभरून प्रतीसाद दिला आहे.

हे ही वाचा-

फेसबुकवर मैत्री झालेल्या मैत्रिणीला घरी कोणी नसताना बोलावले, नंतर घडला हा धक्कादायक प्रकार

रोज करा हा घरघुती सोप्पा उपाय; गुप्तरोग बरा होतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते

VIDEO: साडी घालून महिलेने केला जबरदस्त डान्स; आतापर्यंत ९० लाख लोकांनी बघितला व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.