धनत्रयोदशीला पितळाची भांडी खरेदी करण्याचे महत्व तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

जुन्या काळात लोकांकडे पितळाची भांडी असायची. आताही काही घरांमध्ये आपल्याला पितळाची भांडी पाहायला मिळतील. पितळशिवाय कासे, लोखंड आणि तांब्याची भांडी सुद्धा वापरली जायची.

परंतु आता पितळाचा वापर खूप कमी झाला आहे. त्याची जागा आता स्टील, अल्युमिनियमच्या भांड्यानी घेतली आहे. कारण ही भांडी वापरण्यास, ठेवण्यास आणि धुण्यास सोपी असतात आणि शिवाय यांच्या ती काळी पडत नाहीत.

पण पितळाचा वापर आपण केला पाहिजे कारण यामध्ये शिजवलेले अन्न हे स्वादिष्ट असते आणि आरोग्याच्या दृष्टीने ते खूप लाभदायक असते. काही पुराणिक ग्रंथांमध्ये पितळाचे महत्व सांगण्यात आले आहे. पितळाचे फायदे आपण जाणून घेऊयात.

पितळाचे भांडे लवकर गरम होते यामुळे गॅस व इंधन वाचते. पितळ हा धातू खूप मजबूत असतो. पितळेच्या कलशामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने ऊर्जा मिळते. कन्यादानात पितळी कलशाचा वापर केल्यास ते शुभ मानले जाते.

बालकाच्या जन्मावेळी नाळ कापल्यानंतर पितळेचे भांडे वाजवले जाते. असे मानले जाते की, यातून पितृगणांना सांगितले जाते की, तुमच्या कुळात पिंडदान करणार्‍या वंशजाचा जन्म झाला आहे.

धनप्राप्तीसाठी पौर्णिमेच्या दिवशी पितळाचा शुद्ध तुपाने भरलेला कलश अर्पण केला पाहिजे. वैभवलक्ष्मीच्या पूजेत पितळी दिवा लावावा. असे मानले जाते की, धन्वंतरी देवाला पितळचे पात्र खूप प्रिय असते, यासाठी धनत्रयोदशीला अनेक लोक पितळी भांडे अवश्य खरेदी करतात. यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा किंवा आशिर्वाद मिळतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.