“फडणवीस साहेब तुमचे ‘ते’ व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”; धनंजय मुंडेंचा थेट इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विशेष मुलाखत दिली. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात कधीच पाहिला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. आता धनंजय मुंडेंनी ठाकरेंची पाठराखण करत फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशारा धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

तसेच “उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टिका केली आहे.

“सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील असं वाटत होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केलती.

‘मुख्यमंत्र्यांची सामनातील मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नाही’

धरम पाजीच्या रागाला बघून श्रीदेवी लाईव्ह शोमधून पळून गेल्या होत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.