धनंजय मुंडे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; स्वतः ट्विट करून दिली माहिती

महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोना संसर्गाची लागण झाली होती. आता पोटाचा त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोटाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनीच स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे.

“तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल”, असे ट्वीट मुंडे यांनी केले आहेत.

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश होता. धनंजय मुंडे यांनी जून महिन्यात कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पूर्वीसारखेच कामही सुरू केले होते.

बिहार निवडणूक निकालावर शरद पवार म्हणतात…

राहुल गांधी पुन्हा ठरले अपयशी! सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला! मुख्यमंत्री कोण होणार? भाजप नेता म्हणतोय..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.