सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तप्त झाले असून त्यांच्यावर टिका होत आहे. फेसबूक पोस्ट द्वारे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान ते भल्या पहाटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या सर्व प्रकरणानंतर धनंजय मुंडे हे सर्वांपासून दूर राहताना दिसत आहेत. पण मुंबईच्या मलबार हिल येथील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे शासकीय निवासस्थान चित्रकूट बंगल्यावर
पोलीस, सुरक्षारक्षकांचा ताफा यांच्याशिवाय धनंजय मुंडे पहाटे एकटेच दिसले.
पहाटे अडीच वाजता धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज आला नाही. पण नंतर समजले ते मुंडेच होते. पण यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीसारखे पोलीस आणि सुरक्षारक्षक नव्हते. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.
धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मिडियावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत काही पोस्ट व्हायरल केल्या आहेत. पण या प्रकरणात आता खुद्द धनंजय मुंडे यांनी खुलासा करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपच नाही तर पेटीएम अॅपही घेते तुमची महत्त्वाची माहिती; वेळीच व्हा सावध नाहीतर….
आत्म.हत्येची चिठ्ठी लिहून गायब झालेला शेतकरी सापडला; बच्चू कडूंविरुद्ध पत्नीने केली होती तक्रार
“…म्हणून दोन टक्केवाला ब्राह्मण असूनही राजकारणात टिकलो”; फडणवीसांनी सांगितला राजकीय मंत्र