गरीब मुलांच्या स्वप्नांसाठी संघर्ष करणारी धनश्री आता कोमात मृत्यूशी झुंजतेय; तिला मदत करा

पुणे: धनश्री सुनील कुंभार या पुण्यातील समाजसेवक तरूणीचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री गंभीर जखमी झाली. हॉस्पीटलमध्ये गेले असता डॉक्टरांनी जाहीर केले की ती कोमात गेलीय. त्यामुळे तिच्या कुटुंबाकडून तिच्यावर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कुटुंबीय एकिकडे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी मदत गोळा करत आहेत. तसेच धनश्रीला गंभीर दुखापत करणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाईचीही मागणीही कुटुंबीयांकडून केली जात आहे. अपघात होऊन तब्बल 11 दिवस उलटूनही आरोपी रिक्षाचालकाला अटक न झाल्याने पोलिसांवरही टीका केली जात आहे.

धनश्रीला रिक्षाचालकाने दिलेली धडक इतकी जोरात होती की ती जाग्यावरच बेशुद्ध झाली. याच अवस्थेत स्थानिक नागरीकांनी धनश्रीला दवाखान्यात दाखल केले. सध्या तिच्यावर नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तिच्या उपचारावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय. तिच्या उपचारासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

डॉक्टरांनी धनश्रीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याचं सांगितलंय. सध्या ती कोमात असून केवळ आपल्या हाताची बोटांची थोडीशी हालचाल करत आहे. त्यामुळे ती कोमातून बाहेर येऊपर्यंत तिच्यावरील उपचाराचा खर्च हे मोठं आव्हान तिच्या कुटुंबीयांसमोर आहे.

धनश्री कुंभार मुळची सातारा जिल्ह्यातील कराडची आहे. ती उच्च शिक्षणासाठी पुण्यात आली. तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतलं. धनश्रीने पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं होतं. महाविद्यालयातही तिने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग होता

तिला स्पर्धा परीक्षेतून सरकारी अधिकारी व्हायचं होतं. यासाठी ती पुण्यातील वारजे, शिवणे येथे राहत होती. अभिमानाची गोष्ट म्हणजे ती स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना असंच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही धनश्री मदत करत होती. त्यांच्या अडचणींसाठी सतत लढत होतीच तसेच या गरीब मुलांना पुर्णपणे मोफत शिकवतही होती.

सामाजिक संवेदना जाग्या असलेल्या धनश्रीने अनेक पुण्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये देखील सहभाग घेतला आहे. धनश्रीने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे शहर सचिव या पदावरही काम केलं आहे. तसेच ‘राईट टू लव्ह’ या तरूणांसाठीच्या मोहिमेतही समन्वयक म्हणूनही काम केलंय.

धनश्रीच्या उपचारासाठी अनेकांनी केलय आर्थिक मदतीचं आवाहन
धनश्रीच्या उपचारासाठी 15 लाख इतक्या मोठ्या खर्चाचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची परिस्थिती कुटुंबाची नसल्याने त्यांनी मदतीचं आवाहन केलंय. धनश्रीच्या उपचारासाठी मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलंय.

धनश्रीने तिचा अभ्यास सांभाळून जमेल तशी समाजाची आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. आता समाजाने तिला मदत करण्याची गरज आहे. तेव्हा आम्हीही तिला मदत करण्याचे आवाहन करतो आहे. आपण मदत केल्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट कमेंट करा. त्यावरून इतरांनाही प्रेरणा मिळेल.

अशाप्रकारे करा मदत
गुगल पे नंबर : 9922778408 (सुनिल कुंभार – धनश्रीचे वडील)
बँक खाते तपशील
Sunil Anant Kumbhar
Bank of India Brand
Warje Malwadi (Pune)
SAVING ACCOUNT NO.
053310110008792
IFSC : BKID0000533
मिलाप या संस्थेच्या माध्यमातूनही मदत करु शकता
https://milaap.org/fundraisers/support-dhanashri-kumbhar-1

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.