Share

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: ‘तळतळाट द्यायला भाग पाडू नका’, धनंजय पोवार यांची महादेवी हत्तीणीला परत आणण्याची भावूक विनंती

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant:  नांदणी मठातील (Nandani Math) लाडकी महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनतारा (Vantara) अभयारण्यात हलवण्यात आली आहे. तिच्या निरोपावेळी गावभर भावूक वातावरण होतं. ग्रामस्थांनी तिला डोळ्यांत पाणी आणत मिरवणुकीने निरोप दिला. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर गावकऱ्यांच्या मने जिंकलेली कुटुंबातील सदस्य होती. तिच्या जाण्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र भावनिक अस्वस्थता आहे. अनेकांनी न्यायालयाच्या आदेशावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी केली आहे.

अशातच बिग बॉस मराठी फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपीदादा यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडिओ शेअर करत सरकार आणि वनविभागाला हाक दिली “लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, महादेवी आम्हाला परत द्या.”

डीपीदादाची भावनिक हाक

धनंजय पोवार यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं “न्यायालयाच्या निर्णयानंतर महादेवीला वनविभागाने नेलं, त्यानंतर इथे प्रचंड अस्वस्थता आहे. हा विरोध आर्थिक नाही, हा पूर्णपणे भावनिक विषय आहे. जिला आम्ही महादेवीचा दर्जा दिला, जिच्याकडे श्रद्धेने आणि प्रेमाने पाहतो, ती आता आमच्यापासून हिरावली गेली आहे. ती माणसांच्या सहवासात वाढलेली, त्यांच्या प्रेमाची भुकेली आहे. तिच्या आशीर्वादाने आणि सहवासात अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक सीमाभागात तिच्या प्रेमामुळे लोक नेहमी एकत्र आले.”

ते पुढे म्हणाले “लाखो लोकांच्या भावना यामध्ये गुंतलेल्या आहेत. या सर्वांचा विचार करून महादेवीला पुन्हा परत द्या. मला एवढंच सांगायचं आहे. या लाखो लोकांना तळतळाट करायला भाग पाडू नका.”

महादेवीच्या जाण्यामागची कहाणी

नांदणी मठ जैन धर्मियांचं पवित्र स्थान मानलं जातं. येथे मागील 33 वर्षांपासून महादेवी राहत होती. जैन धर्मात हत्तीला पवित्र मानलं जातं, त्यामुळे मठ तिचा सांभाळ करत होता. मात्र, 2021 मध्ये गुजरातमधील खाजगी वनतारा अभयारण्याने महादेवीची मागणी केली आणि त्याबदल्यात देणगी स्वरूपात मदत करण्याचं आश्वासन दिलं. धार्मिक भावनांचा आदर करत मठाने नकार दिला.

यानंतर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा (PETA) संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हाय पॉवर कमिटीने महादेवीची स्थिती तपासून अहवाल दिला. दोन्ही बाजूंचे पशुवैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर न्यायालयाने महादेवीला वनतारा येथे हलवण्याचे आदेश दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

गावकऱ्यांचा भावनिक विरोध

महादेवीला निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी होतं. अनेकांनी सोशल मीडियावरून तिच्या पुनरागमनाची मागणी सुरू केली आहे. काहींनी जिओवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महादेवीच्या जाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now