रेणूनंतर करूणा शर्माने केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने काही दिवसांपुर्वी बला.त्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. परंतु त्यानंतर संबंधीत महिलेनं तक्रार मागे घेतल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला होता.

आता पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर याच महिलेच्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करत त्यात म्हटले की, धनंजय मुंडे यांनी माझ्या दोन्ही मुलांना चित्रकुट बंगल्यात तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे. मला त्यांना भेटायला जावू दिले जात नाही. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी याबाबत बाजू मांडली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

करूणा शर्मा यांच्याशी असलेल्या वादाची मी याआधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी दोघांनी उच्च न्यायलयाकडे मेडियटर नेमण्याची विनंती केल्यावर मद्रास उच्च् न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहीलरामाणी यांची नियुक्ती केली आहे. आमच्या दोन बैठका झाल्या असून १३ फेब्रूवारी २०२१ रोजी पुढील बैठक होणार आहे. यामध्ये मुलांच्याबाबत चर्चा होणार आहे आणि यावर तोडगा निघेल. असे असतानाही मुलांच्या बाबत तक्रार करणे मला चुकीचे वाटत आहे. केवळ मला बदनाम करण्याच्या हेतूने करूणा यांनी हे केलं आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

दरम्यान, या आरोपानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो का? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुराग कश्यपच्या मुलीचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून घायाळ व्हाल
मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’
‘शर्जील उस्मानीच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा’, फडणवीसांचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.