मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बला.त्काराचा गंभीर आरोप लावला गेला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आरोपानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आशात ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात एका बैठकीसाठी उपस्थित झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात एक बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडे या नेत्यांसोबत त्याठिकाणी पक्ष कार्यालयात होते. यानंतर मुंडे यांनी प्रसारमांध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘’मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिले आहे. बुधवारी सकाळी मी त्यांची वेळ घेतली होती. त्यांना भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. माझ व्यक्तीगत मत प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिले आहे’’.
तसेच पत्रकारांनी राजीनाम्यासंबंधी विचारणा केली असता ते म्हणाले, ‘’याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील. आणि त्याबाबतचा निर्णय घेतील’’.
सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यावर अचानक इतक्या गंभीर आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. तेसच मुंडे यांची फेसबुक पोस्ट या आरोपांपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले की, ‘आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. यासंबधी पक्ष म्हणून विचारविनिमय केला जाईल. पक्षातील इतर नेत्यांसमोर हा विषय चर्चेसाठी ठेवला जाईल. पक्षप्रमुख म्हणून जे निर्णय घ्यावे लागतील ते तातडीने घेतले जातील’’. शरद पवारांचे हे विधान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे संकेत म्हणून पाहीले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
“धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, तर नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाहीत”
पोलीस, सुरक्षारक्षकांशिवाय भल्या पहाटे धनंजय मुंडे एकटेच चित्रकूट बंगल्यावर; माध्यमांना दिला चकवा