मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. ‘हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु,’ असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे.
याचाच धागा पकडत महाराष्ट्र करणी सेनेचे अजय सिंह सेंगर यांनी एक सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. ‘मुस्लीम व्यक्ती ४ विवाह करू शकतात मग हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं?’ असे त्यांनी याबाबत बोलताना म्हंटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यघटना सगळ्यांनाच समान आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे बंधन असू शकत नाही. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही असं सेंगर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडे यांना लागू होऊ शकत नाही. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. त्याचसोबत पहिल्या पत्नीपासून सुख मिळत नसेल तर मुस्लिमांप्रमाणे दुसरं लग्न करू शकतात, मुस्लीम लोक ४-४ विवाह करतात, मग हिंदूने दुसरं लग्न केले तर चुकीचं काय? असे अजय सिंह सेंगर यांनी म्हंटले आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर….
या प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल,’ अशा तिखट शब्दात सावंत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपाचा हल्लाबोल; ‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण…’
मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा जावई एनसीबीच्या रडारवर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ