धनंजय मुंडेंना दिलासा! रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे; दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | अखेर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याने खळबळ माजली होती.

कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती मिळत आहे.

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे…
धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला होता.

या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत असल्याचे म्हंटले होते.

तक्रारदार महिलेचा यु-टर्न? ‘मी माघार घेते, पण…’
काही दिवसांपूर्वीच तिने ट्वीट करत म्हंटले होते की, ‘तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत?,’

महत्त्वाच्या बातम्या 

अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना थेट मुंबईत जाऊन आव्हान; मुद्दे पाहून खुष व्हाल
सोनू सूदला उच्च न्यायालयाचा तगडा झटका; मुंबई महापालिकेविरोधातील याचिका फेटाळली
लसीशिवायही ‘या’ उपायाचा वापर कोरोनाला पूर्णपणे रोखणार; वैज्ञानिकांचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.