एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.(Dhananjay Munde met Fadnavis at midnight)
काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला आहे. यादरम्यान काल रात्री साडेबारा वाजता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे काल रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गोटातले समजले जातात.
त्यामुळे या भेटीमध्ये काही खलबत झाल्याची चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजप युवा मोर्चामध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “नव्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चात एकत्र होते. त्यामुळे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले असावेत.”
“त्यामध्ये दुसरं काहीही कारण असणं गरजेचं नाही. धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. विधानसभेत प्रमुख तोफ म्हणून आम्ही धनंजय मुंडे यांच्याकडे बघतो. धनंजय मुंडे हे भाजपकडून राष्ट्रवादीकडे आले आहेत. धनंजय मुंडे यांचे भाजप नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं स्वाभाविक आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल,’ संजय राऊतांनी केलं भाकित
…त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता; ठाकरे सरकार पडताच शिवसेनेने केला गौप्यस्फोट
..त्यामुळे फडणवीस आणि नड्डा यांच्यात विसंवाद असल्याच स्पष्ट दिसून आलं; वाचा दिल्लीदरबारात नेमकं घडलं काय?