कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. शिवशक्ती पक्षाच्या तिकिटावरच करुणा शर्मा ही पोटनिवडणूक लढवत आहेत. अर्ज(Form) दाखल करण्यासाठी करुणा शर्मा कोल्हापुरात आल्या होत्या.(Dhananjay Munde is coming up with a book on my 25 year love story)
त्यावेळी करुणा शर्मा यांनी कोल्हापुरातील मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी करुणा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहेत, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
यावेळी करुणा शर्मा म्हणाल्या की, “आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या पुस्तकामधून अनेक पुरावे समोर येणार आहेत. या पुस्तकामध्ये २५ वर्षांची कहाणी असणार आहे. या पुस्तकात पुराव्यांसोबत लग्नाचे फोटो देखील असणार आहेत. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झालं आहे. हे पुस्तक हिंदी आणि मराठी भाषेत प्रकाशित केलं जाणार आहे.”
करुणा शर्मा यांनी पोटनिवडणूकीसाठी दाखल केलेल्या अर्जामध्ये नावावरून तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. याबद्दल बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, “माझ्याकडे जे पेपर आहेत, त्याच्या आधारावरच मी फॉर्म भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही त्रुटी नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहे.”
“माझ्या पतीने सहा-सहा मुले लपविली आहेत. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. माझ्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. सर्वाना हे पुरावे दिसतीलच”, असे करूणा शर्मा यांनी सांगितले आहे. कोल्हापूर पोटनिवडणूकीच्या संदर्भात बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या की, “मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. कोल्हापूरची जनता मला विधानसभेत पाठवेल. ”
काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांना ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “करुणा शर्मा मुंडे यांच्यावरही चित्रपट काढण्यासाठी दिग्दर्शक रांगेत उभे आहेत. माझ्यावर आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट काढला तर जनतेला कळेल महाराष्ट्राचे राजकारण कसे आहे? इथले नेते कसे आहेत?”
महत्वाच्या बातम्या :-
योगी आदित्यनाथ यांना बहिणीचे आवाहन; म्हणाली, ‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी…’
एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलाने थेट स्मृती इराणींसाठी लिहीली खास नोट, म्हणाला, प्रिय स्मृती मावशी..
या’ बॉलिवूड अभिनेत्याचे चित्रपट पाहण्यासाठी पाकिस्तानमध्ये व्हायची चेंगराचेंगरी