बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणानंतर खूप दिवसांनी धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. यावेळी समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जीवनात कधीच कोणाचं मन दुखवून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे. आपलंही मन जिंकलंय म्हणून एवढं मोठं स्वागत केलं,” असेही मुंडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक
‘ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’
आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.