‘माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी तुमच्या उपकाराची परतफेड होणार नाही’

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर प्रथमच धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे भावूक झाले.

तसेच आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असे सांगत मुंडे भावूक झाले. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. मन जिंकून मी स्थान निर्माण केले असल्याचे मुंडे म्हणाले.

तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…
मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना पवार म्हणतात, ‘रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही,’ असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, ‘या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या
दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.