मुंबई | सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी आता भाजपाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही.’
तसेच ते पुढे म्हणतात ,’ज्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो, मात्र गेंड्याचे कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.’
…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
या प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ‘धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जो पर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे,’ ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा जावई एनसीबीच्या रडारवर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; ‘एवढ्या’ दिवसांसाठी घातली बंदी