‘धनंजय मुंडे यांनी आपल्या लग्नाबाह्य संबंधांची कबुली दिली असतानाही शरद पवार गप्प का?’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने काही दिवसांपुर्वी बला.त्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मुंडे यांच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

अशातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या लग्नाबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. याशिवाय त्यांनी करुणा शर्माच्या मुलांना डांबुन ठेवल्याचाही आरोप आहे, इतक्या प्रकरणानंतरही पवार गप्प का? पवार नेकीने वागणारे असतानाही ते गप्प का? असा सवाल त्यांनी केला आहे.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘एक जण बंगल्यावर नेऊन मारतो, दुसरा पोलिसांना मारतो, तिसरा बलात्कार करतो…हे सरकार जनतेने निवडून दिलं नाही, म्हणून उत्तरदायी नाही असं महाविकास आघाडी सरकार वागत आहे,’ अशी टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले…
या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसे ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते.

महत्त्वाच्या बातम्या
‘शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याने आहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावू नये म्हणून…’
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?
मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.