काल रात्री राष्ट्रवादीचे प्रख्यात नेते तसेच माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा परळी रोडवर जबर अपघात झाला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहेत. त्यांना मुका मार लागल्याचे कळाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
मौलाना आझाद चौकात परळी येथे हा अपघात झाला आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचे धनंजय मुंडेंनी सकाळी दिली होती. पुढील उपचारासाठी मुंडे यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेण्यात येणार आहे त्यासाठी लातूरहून एअर व्यवस्था केली जाणार आहे.
धनंजय मुंडेंची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंत्र्यांनी त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली आहे. या अपघातात धनंजय मुंडेंच्या गाडीचे नुकसान झाले असून गाडीचा चुराडा झाला आहे. काहींनी मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या सगळ्या धटनेची माहिती दिली आहे. माझी तब्येत चांगली असून, मला मुका मार लागल्याचे त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही नमूद केले आहे. धनंजय मुंडेंनी केलेलं रिट्विट त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या ट्विटरवरुन करण्यात आले आहे. कल दिवसभरच्या काम काजाच्या मीटिंग आटपून रात्रीच्या सुमारास साधारण 12.30 वाजता हा अपघात झाला आहे.
https://twitter.com/OfficeofDM/status/1610495804132962306?s=20&t=KfERgoHYNNrRao7Z8G48dg
मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचे सांगितले आहे असे या ट्विटमध्ये नमुद केले आहे. मुंडेंच्या म्हणण्यानुसार हा अपघात छोटा असला तरी त्यांच्या गाडीचे खुप नुकसान झाले आहे.
‘साहेबांची प्रकृती ठीक असून, काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन दुसऱ्या ट्विटमधून करण्यात आलं आहे. हे ट्विट केल्यानंतर त्यावर मुंडे समर्थकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मुंडे यांचे समर्थक त्यांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. तर काही लोक त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत.’
महत्वाच्या बातम्या
Dhananjay Munde : “आमचं बहीण-भावाचं नातं आता…” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Pankaja munde : पंकजा मुंडे भाजपमध्ये पुन्हा नाराज? पक्षाध्यक्ष नड्डांसमोर ३० सेकंदात भाषण उरकल्यावर केला ‘हा’ खुलासा
sharad pawar : आरक्षण-आरक्षण बस्स झालं! यापुढे..; शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा