दीपाली चव्हाण आत्महत्या! रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न…

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपुर्वी दिपाली यांनी सुसाइड नोट लिहून उप वन संरक्षक(DFO) विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दिपाली चव्हाण यांची सुसाइड नोट-
कामाच्या बाबतीत काहीही खटकले तर शिवकुमार आपल्याला निलंबित आणि चार्जशीट करण्याची धमकी द्यायचे. अक्टोंबर २०२० मध्ये प्रेग्नेसीमुळे मी ट्रेक करू शकले नव्हते तर मला सलग तिन दिवस कच्च्या रस्त्यावरून फिरवलं. त्यात माझा गर्भपात झाला. पण तरीही मला सुट्टी दिली नाही.

नोकरी परिवारासाठीच करतो. पण इथे राहून परिवारासोबत एक दिवस घालवता येत नाही. शिवकुमार हे रात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. याबाबत आधी तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

याशिवाय, शिवकुमार समोर शिविगाळ करतात. मला सहन होत नाही. कित्येक वेळा रात्री त्यांनी संकुलला बोलावले. आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मर्जीने न वागल्यास शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. इतकं लिहून देखील तुम्ही त्यांच काही बिघडवू शकणार नाही. कारण तुमचाच त्यांच्या डोक्यावर हात आहे.

माझे रोखलेले वेतन तत्काळ काढून द्यावे. माझ्यामृत्यूनंतरचे सर्व आर्थिक लाभ माझ्या आईला द्यावेत. शिवकुमार यांच्या बाबतच्या अनेक तक्रारी आहेत त्यांना कधी तरी गांभीर्यांने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचे नाव खराब होत आहे. स्टाफसोबत त्यांचे वागणे खूप वाईट आहे.

तसेच पुढे त्या लिहितात, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. ते खूप घाण शिव्या देतात. फिल्डवर खूप त्रास देतात. माझ्या आत्महत्येला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार सर्वस्वी जबाबदार आहेत.

शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा आहे. जे माझ्यासोबत झालं ते यापुढे कोणासोबत होऊ नये. असा आशय असलेली मनाला सुन्न करणारी सुसाइट नोट दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“होय कट मीच रचला होता”, अखेर सचिन वाझेनी दिली कबुली; सांगितले ‘हे’ धक्कादायक कारण

..तर दिपालीचा जीव वाचला असता; दिपालीच्या हत्येला चाकणकरांनी धरले नवनीत राणांना जबाबदार

दिपाली चव्हाणच्या हत्येत नवनीत राणांचा अप्रत्यक्ष सहभाग?; चाकणकरांनी मांडली नवी थियरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.