‘ही’ गोष्ट खाल्ल्याने माणूस राहतो तंदरुस्त; १११ वर्षांच्या आजोबांनी सांगितले आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य

आपण बघतो की माणूस साधारणत: शंभरी पार करण्याचे आतच आपले प्राण सोडतो, पण जगात काही लोक असे पण आहेत, जे शंभरी पार असले तरी त्यांचे आरोग्य अजूनही चांगले असून त्यांची तब्बेत एकदम धडधाकट दिसते.

ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या या आजोबांचे नाव डेक्सटर क्रुगर असे आहे. ते एक रिटायर्ड पशुपालक असून त्यांचे वय तब्बल १११ वर्ष १२४ दिवस इतके आहे. क्रुगर हे पहिल्या विश्व युद्धाचे अनुभवी जॅक लॉकेट यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, पण २००२ मध्ये जॅक यांचा मृत्यु झाला होता.

क्रुगर यांनी ऑस्ट्रेलियन बॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या दिर्घ आयुष्याचा खुलासा केला आहे. त्यांनी वय वाढत असतानाही आरोग्य चांगले राहण्यासाठी चिकनचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चिकन ब्रेनबद्दल तुम्हाला माहित असेल. चिकनच्या डोक्यामध्ये त्याचा मेंदू असतो. ती गोष्ट खायला खुप स्वादिष्ट असते. ती एक खुप छोटी गोष्ट असते, जी आपण खायली हवी. माझ्या या वयामध्येही मला तंदरुस्त ठेवण्यात त्याचे मोठे योगदान आहे, असे क्रुगरने म्हटले आहे.

तसेच ते खाल्ल्यामुळे बुद्धीपण शाबुत राहते, असेही क्रुगर यांनी म्हटले आहे. क्रुगर सध्या आपली आत्मचरित्र लिहित आहे. कदाचित ते तिथे असणारे सगळ्यात शार्प बुद्धी असणाऱ्या लोकांमधले एक आहे. १११ वर्षाच्या वयातही माझा मेंदू चांगले काम करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

क्रुगर यांच्या मुलाचे नाव ग्रेग असून तो ७४ वर्षांचा आहे. आपल्या वडिलांच्या साधारण राहणीमानामुळे त्यांचे वय इतके असूनही त्यांचे आरोग्य चांगले आहे, असे ग्रेगने म्हटले आहे. क्रुगर यांची द ऑस्ट्रेलियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून ते ऑस्ट्रेलियातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे.

महत्वाच्या बातम्या-

जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा सविस्तर
या महिलेच्या केकचे सेलिब्रीटीसुद्धा आहेत दिवाने, केक बनवून कमावते ३० ते ४० लाख रूपये
टेलिव्हिजनवरील कलाकारांचे घर फक्त अभिनयाने चालत नाही; म्हणून करतात ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.