फुकटचे सल्ले देणं थांबव अन् स्वत: लोकांना मदत कर; अभिनेत्रीने कंगणाला सुनावले

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या ट्विटमुळे खुप चर्चेत आहे. तिच्या ट्विटमुळे अनेक लोकांनी तिला ट्रोल केले आहे. आता पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने कंगणावर निशाणा साधला आहे.

देवोलीना ही आपल्या स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता तिने कंगणाच्या ट्विटवरही निशाणा साधला आहे. दुसऱ्यांवर टिका करुन प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा स्वत: मदत कर अशी टिका देवोलीनाने केली आहे.

देवोलीनाने नवभारत टाईम्सला मुलाखत दिली होती, त्यावेळी तिने सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. यावेळी तिने कंगणाच्या ट्विटवरही भाष्य केले आहे. ट्विटबाबत बोलताना कंगणाने टिका करण्यापेक्षा मदत केली पाहिजे, असे देवोलीनाने म्हटले आहे.

कंगणाने वायफळ बडबड थांबवावी आणि स्वत: घराबाहेर पडून लोकांना मदत करावी. ऑक्सिजन कुठे मिळतंय, लस मिळवण्यासाठी कुठे आणि कसे रजिस्ट्रेशन करावे, कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध आहे. यासांरखी कित्येक कामे ती पैसे खर्च न करता करु शकते, असे देवोलीनाने म्हटले आहे.

सध्या स्थिती गंभीर आहे, त्यामुळे इतर सेलिब्रिटी आपआपल्या परीने मदत करत आहे. पण कंगणा फक्त सल्ले देतेय आणि लोकांवर टिका करतेय, असे म्हणत देवोलीनाने कंगणावर टिका केली आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ३ लाख ६० हजार ९६० कोरोना रुग्ण देशात सापडले आहे. देशात गेल्या २४ तासाच ३२९३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री मलायका म्हणे, मी पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत रेलशनमध्ये आहे, पण मुलाला..
मिस्टर इंडीया किताब जिंकलेल्या मराठमोळ्या बाॅडीबिल्डरचे ३४ व्या वर्षी कोरोनाने निधन
‘रोहित सरदाना मनोरूग्ण खोटारडा होता, तो पत्रकार म्हणून कुणाच्याही आठवणीत राहणार नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.