‘खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती सोबत केली तर…’

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी आता कलाविश्वातील पार्ट्या आणि त्यातील ड्रग्स सेवन हा नवा मुद्दा समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणी आता कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अंकिताने सुशांतला न्याय मिळावा यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अंकिताला पाठींबा देण्यासाठी अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

मात्र यामध्ये चर्चा झाली ती म्हणजे ‘साथ निभाना साथिया’ फेम गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्जीची. याचे कारण असे की, देवोलीनाने देखील अंकिताला पाठींबा देत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

परंतु, नेटकऱ्यांनी जुना वादावर बोलत देवोलीनाची तुलना रिया चक्रवर्तीसह केली. यानंतर नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र देवोलीना टीका करणाऱ्यांवर चांगलीच संतापली.

दरम्यान, ‘मी कधीच ड्रग्सच्या आहारी गेली नाही. कधीच कोणाच्या पैशाचा मी चुकीचा वापर केला नाही. कोणाचाही माझ्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला नाही. कधी कोणाची बदनामी केली नाही,’ असे म्हणत देवोलीनाने संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रिक्षानंतर दुचाकी चालकांनाही मनसेचा दिलासा; फायनान्स कंपनीने कर्जाची रक्कम केली माफ
मोदींविरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोहीम सुरू असतानाच राज्य सरकारकडून सर्वांत मोठी भरती जाहीर
‘मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झाले तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.