‘देवमाणूस’मधला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा; कारण वाचून डोळे पाणावतील

आपण नेहमीच अनेक कलाकारांचे स्टारडम बघत असतो. त्यांची प्रसिद्धी बघत असतो, पण त्यामागे त्यांचे अथक परीश्रम लपलेले असतात.

आज पण अनेक कलाकार उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळी कामे करताना आपल्याला दिसून येतात, आजची ही गोष्ट पण एका अशाच कलाकाराची आहे, जो एक प्रसिद्ध मालिकेत काम करत असूनही उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत आहे.

झी मराठीवर लागणारी ‘देवमाणूस’ या मालिकेला खूप कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला देवमाणूस मालिकेतील सर्वच कलाकारांनी हजिरी लावली होती. त्यामुळे कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितलेले आहे.

देवमाणूस मालिकेतील ‘बज्या’ची भूमिका साकारणारा किरण डांगे यानेही आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले आहे. किरणची आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे. त्यामुळे तो कल्याणमध्ये रिक्षा चालवतो.

आपल्याला कलाकारांचे स्टारडम दिसून येते पण त्यामागची त्या कलाकारांची मेहनत आपल्या दिसून येत नाही. किरणने सांगितलेल्या त्याच्या संघर्षाच्या कहाणीमुळे चला हवा येऊ द्याच्या सेटवर अनेकांचे डोळे पाणावले होते.

तसेच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आल्यानंतर किरणने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे, शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलना पासून , आपल्या चाळीतल्या गणपती पासून , पथनाट्य पासून, आज……आज सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठीवरील ‘ देवमाणूस ‘ मालिके पर्यंत आणि आता नट म्हणून काम करताना आयुष्यात एकदा तरी आपल्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम व्यासपीठ ठरलेलं ‘चला हवा येऊ द्या’ येथे जायला मिळावं हे स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र काम करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या लाखो नटानं पैकी मी एक.

आज मी त्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो ज्या माणसाच्या कुठल्या ना कुठल्या मदतीमुळे , सपोर्टमुळे , विश्वासामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्यासारख्या सर्व सामान्य घरातून नट होऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना इतकच सांगेन.तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न.

महत्वाच्या बातम्या
तुझे करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही! अभिनेत्याची सलमान खानला धमकी
काय सांगता! इस्राईलमध्ये सापडले 1000 वर्ष जुन्या कोंबडीचे अंडे, मात्र पुढे असं झालं की…
आरारारा खतरनाक…, इंग्लडची राणी एलिझाबेथनं कापला तलवारीनं केक, व्हिडीओ तुफान व्हायरल
कुठं गेली माणुसकी! वृद्ध वाहून जात होता आणि ग्रामस्थ व्हिडीओ काढत होते, पहा भयानक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.