देवमाणूस मालिकेमधील चिमुरडी मायरा आहे ३२ नामवंत ब्रॅण्डची मॉडेल; जाणून घ्या..

“देवमाणूस “ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे हे आपण जाणत आहोत. या मालिकेच्या वेळेत “रात्रीस खेळ चाले  ३”ही नवीन मालिका सुरु होणार आहे, त्यामुळे देवमाणूस या मालिकेच्या आटोपतीवर भर देण्यात आला आहे.

देवमाणूस मालिकेतील डॉक्टर या पात्राने केलेल्या कटकारस्थानाचा सुगावा या मालिकेतील नवीन पात्र दिव्या सिंग घेत असल्याचे आपल्याला दिसून येते. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात दिव्या सिंग आणि तिची मुलगी मायरा यांचा अभिनय पाहायला मिळतो.

दिव्या सिंगची भूमिका नेहा खान साकारत आहे तर मायरा या बालकलाकाराची भूमीका अर्नवी खडसे साकारताना दिसून येते. मायरा म्हणजेच अर्नवी खडसे बदल जाणून घेऊ काही खास गोष्टी.

तिचा जन्म ३ ऑगस्ट २०१५ रोजी झाला. अर्नवीचे वडील योगेश खडसे हे मूळचे अमरावतीचे असून कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करतात. अर्नवीला मिमी खडसे या टोपण नावाने देखील ओळखले जाते.

जाणून घेण्यास कौतुक वाटते कि अर्नवीने अनेक नामवंत ब्रॅण्डसाठी चाईल्ड मॉडेल काम केले आहे. या कामांसाठी तिला अनेक बक्षिसे मिळाली आहे. अर्नवी आणि तिची मोठी बहीण चारवी या दोघीही वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी मॉडेल म्हणून रॅम्पवॉक करतात.

अर्नवीने जेनेलिया,रितेश देशमुख,अमेय वाघ यांसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तिने केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे तिला जवळपास २२ हुन अधिक शोमध्ये विजेतेपद मिळाले आहे.

westside,disney,fbb,first cry,rose counture,doll kerry kids यांसारख्या जवळपास ३२ नामवंत फॅशन ब्रॅण्डसाठी अर्नवीने मॉडेल म्हणून काम केले आहे.

एवढ्या कमी वयात फॅशनच्या दुनियेत केलेले तिचे काम नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल. देवमाणूस मालिकेच्या माध्यमातून तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी तिला मिळाली आहे. या कामात तिला निश्चित भरभरून यश व कौतुक मिळेल.

हे ही वाचा..
‘देवमाणूस’ मालिकेतील साधी भोळी डिंम्पी खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; तुमचा विश्वास बसणार नाही
आण्णा नाईक परत येणार…!
टिकटॉक स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, नक्की आत्महत्येचे कारण काय?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.