राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातवांबद्दल बोलताना मंत्री वडेट्टीवार ढसाढसा रडले

काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे रविवार दिनांक १६ मे २०२१ ला सकाळी निधन झाले. कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीव सातव यांना आदरांजली वाहिली आहे.

त्यांच्या निधनाने कॉन्रेस पक्षाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. राजकारणातला देवमाणूस गेला. अशा शब्दात त्यांनी राजीव सातव यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना विजय वडेट्टीवार यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, राजीव सातव तरुण तडफदार नेते होते. ते अतिशय जिद्दी नेते होते. त्यांनी दिल्लीत स्वतःच्या कामाने स्थान निर्माण केले होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या समस्येवर ते शांततेत मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीवजींचे मार्गदर्शन भेटायचं.

दिल्लीत गेल्यानंतर असा एक नेता होता ज्याच्याकडे आपल्या भावनांना मोकळे करून देण्याची जागा होती तो नेताच आम्ही गमावला आहे. विजय वडेट्टीवार यांची समजूत राजीव सातव यांनी काढली होती त्याबद्दलची आठवण पण त्यांनी यावेळी सांगितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात वडेट्टीवार यांना कमी दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले असा त्यांचा समज झाला.

तेव्हा ही गोष्ट राजीवजींना समजल्यावर त्यांनी मला कॉल केला आणि माझी समजूत काढली. त्यांनी नंतर या विषयावर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी पण संवाद साधला. राजीवजींनी त्यांना परत फोन करून त्यांची समजूत काढली आणि त्यांना पक्षात भविष्यामध्ये मोठी जबाबदारी देण्याचा शब्द दिला.

माझ्यापेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या राजीवजींनी माझी समजूत काढली. आज राजकारणातला देव माणूस गेला अशा शब्दात आपल्या भावनांना वडेट्टीवार यांनी वाट मोकळी करून दिली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी होता. त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची क्षमता परमेश्वर देवो अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी प्रार्थना पण केली आहे.

ताज्या बातम्या
खूपच कमी भांडवलावर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, आणि दरमहा लाखो कमवत वर्षात व्हाल १ कोटींचे मालक

संजय दत्तच्या बहीणीसोबत लग्न करण्याअगोदर कपूर कुटूंबाचे जावई होणार होते कुमार गौरव; ‘या’ कारणामूळे तुटले लग्न

सनी लिओनी आहे करोडों संपत्तीची मालकीण; जाणून घ्या कुठे कुठे आहेत बंगले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.