महाराष्ट्र दोन वर्षांपुर्वीच स्वतंत्र झाला, कंगणा पाठोपाठ संजय राऊतांचेही वादग्रस्त वक्तव्य

कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले आहे. आता संजय राऊतांनी केंद्रावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपुर्वी स्वतंत्र करत भगवा फडकावला.

ते एका उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विरोधकांना घेरले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील असेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, १९४७ ला जसे आंदोलन झाले, चलेजावची चळवळ झाली म्हणून ब्रिटीश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती तर कोण पंतप्रधान कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते.

या कारणामुळे कृषी कायदे मागे घेण्यात आले, असंही संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आपण पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लेकी झेंडा ह्या संत वचनान प्रमाणे गेल्या ५० वर्षांपासून काम करत आहोत. नाशिक महापालिकेत शिवसेना शतक करणार आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेची महिला आघाडी जोरात आहे. उद्घाटनाच्या आधी संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलकांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते मोदींनी घेतलेला हा निर्णय दुखद आहे. त्यावर संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांना दुख झाले असेल तर त्यांना शोक संदेश पाठवू, शोक सभा आयोजित करू असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

महत्वाच्या बातम्या
औरंगाबादमधून आर्मीमध्ये भरती होणारी पहिली महिली ठरली शिल्पा, गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक
किळसवाणे! ‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याच्या तोंडावर केली लघुशंका, नंतर म्हणाली..
पाया पडण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याला रोहित शर्माने सांगितली ‘ही’ गोष्ट; वाचून अभिमान वाटेल 
चार दिवस खिडकीत कपडे वाळत घालू नका, मोदी येणार आहेत; पोलीसांच्या नागरीकांना अजब सूचना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.