फडणवीस इन ऍक्शन मोड! गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ या मंत्र्यावर करणार हक्कभंग दाखल

मुंबई | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना जोरदार दणका दिला आहे. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांनी महाविकास आघाडीला वेठीस धरले आहे.

त्यांनी सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता त्यांनी आघाडीतील दोन मंत्र्यांना अडचणीत आणले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

फडणवीसांनी दावा केला आहे की, मराठा आरक्षणाच्या विषयात सभागृहात अशोक चव्हाण यांनी खोटे निवेदन केले आहे. १०२ ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. ऍटर्नी जनरलसंदर्भात त्यांनी चुकीचे विधान केले आहे, असा दावा फडणवीसांनी केला आहे.

त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार अशी घोषणाही त्यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात देखील हक्कभंग प्रस्ताव मांडला. मंगळवारी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप लावले होते.

फडणवीसांवर असा आरोप त्यांनी केला होता की, त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले आहे. त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. यावेळी फडणवीसांनी विधानसभेत अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला.

त्यात न्यायालयाने म्हटले आहे की अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली आहे आणि त्यांना कोणीही आत्महत्येस प्रवृत्त केलेले नाही, असे स्पष्टपणे त्यात म्हटलं आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले आरोप हे चुकीचे आहेत असे फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सापडला ‘खजिना’, लवकरच थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट होणार
..आणि झोमाटोच्या डिलिव्हरी बॉयने तरूणीचे फोडले नाक, कंपनीला मागावी लागली माफी
ऍपल प्रेमींनो! १० हजारापेक्षा कमी किंमतीत घ्या iphone 6 आणि 6s, जाणून घ्या कोठे मिळतायत..
रेखाला पाहून शशी कपूर झाले होते शॉक; म्हणाले, ही काळी अभिनेत्री कशी बनणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.