देवेंद्र फडणवीस पुतण्यामुळे अडचणीत, ४५ पेक्षा कमी वय असताना घेतली लस

मुंबई । राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. असे असताना ४५ पेक्षा जास्त वय आलेल्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने ४५ पेक्षा कमी वय असताना लय घेतली. यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच लस देण्यास सुरुवात केली आहे. मात्र केंद्र सरकारने दिलेल्या नियमाविरोधात फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेसने याबाबत ट्विट केले आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! असे यामध्ये म्हणण्यात आले आहे.
यामुळे फडणवीस अडचणीत आले आहेत.

तन्मय फडणवीसचे वय २५ वर्षांहून जास्त नाही. नागपुरमध्ये त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. त्यानंतर विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते.

राज्यात अनेक ठिकाणी ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना सुद्धा लस मिळत नाही. केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी होत, असून अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.