‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत’

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर टिका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला होता.

ते याबाबत मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्य वर्षपूर्तीला करायची? असा सवाल त्यांनी केला.

त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही, असे फडणवीसांनी म्हटंले आहे. ‘हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री राज्याने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही, असे त्यांनी म्हटंले आहे.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. काल न्यायालयाचे आलेले दोन निर्णय यात त्यांची कारकीर्द दिसून येते. अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही. पण सरकारविरोधी विचार मांडल्यावर ते चिरडून टाकू याच्याशी आम्ही सहमत नाहीत, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
लढा कोरोनाविरूध्द! ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क; घ्या जाणून
मुंबईला पाकव्याप्त कश्मीर, मुंबई पोलीसांना माफीया म्हणने भाजपला मान्य आहे का?
कोरोना लस प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन; जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.