Uddhav Thackeray : मुंबई (Mumbai) – ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत (Mumbai) सोमवारी महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबद्दल “मला तुमची कीव येते” असे वक्तव्य करत त्यांना स्वाभिमान आणि धैर्य दाखवण्याचे आव्हान केले.
त्यांनी सांगितले की, “तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वर दिल्लीत (Delhi) तुमचे नेते बसलेत, तरी भ्रष्ट मंत्र्यांना पदावरून हटवण्याची हिंमत होत नाही. स्वतः भ्रष्टाचार केला नाही, तरी इतरांसाठी बदनामी का ओढवून घेताय? त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण का घालताय? जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे अध्यक्ष करण्यासाठी माणूस नाही, मंत्रिमंडळासाठी प्रामाणिक पर्याय नाहीत का?” असा सवाल ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगावं हा भ्रष्टाचार त्यांना पटतो का? जर नाही, तर वरून येणारा दबाव झुगारून द्यावा. महाराष्ट्र (Maharashtra) नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. आता राज्यातील जनतेला जुलूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. या सरकारने महाराष्ट्राला चुकीच्या मार्गावर नेले आहे. माझ्या काळात मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले. मी एकदा वनमंत्र्याला वाईट वर्तनामुळे ‘वनवासात’ पाठवले होते.”
ते पुढे म्हणाले, “आताचे सरकार जनतेपेक्षा पैशाला प्राधान्य देते. आमच्या संजय परबांनी पुरावे देऊन दाखवले की, राज्यगृहमंत्री बार चालवतात. ‘रम्मी मंत्री’ आता आवडीचे खाते सांभाळत आहेत. शेतकऱ्यांची थट्टा करून सभागृहात रम्मी खेळता. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही समज दिली कसली समज? रम्मी नको तर तीन पत्ती खेळा! मग उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही? जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) कुठे आहेत? त्यांनाही का सोडून दिलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.