एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत.(Devendra Fadnavis to be Deputy Chief Minister; The order was given by the central leaders of the BJP)
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारचे कामकाज योग्य होत राहील, याची काळजी घेणार असल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पण भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अशी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मनाचा मोठेपणा दाखवल्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले.
यावेळी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले की, “भाजप पक्षामध्ये कोणत्याही व्यक्तीला पदाची लालसा नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. पण केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं”, असे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. अमित शाह यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. पण आता शिंदे गटाचं आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे अनेक योजना लवकरच मार्गी लागतील.”
या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमदारांच्या मदतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून आणि इतर पक्ष असे 50 आमदार आम्ही एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षांपुर्वी जे घडलं आहे त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: BCCI ने फटकारलं तरी भारताच्या खेळाडूंना येईना अक्कल, कोरोनाचे नियम मोडून करतायत पार्ट्या
लग्न न करताच आई बनलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते वडील, वाचून भावूक व्हाल
उदयपुरमधील तालिबानी हत्येचे पाकिस्तानी कनेक्शन झाले उघड, धक्कादायक माहिती आली समोर