शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. यानिमित्तानं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का? , असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

या व्हिडीओमध्ये सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधाने घेतलेली आहेत. त्यामुळे भाजपाचे सत्ता गमावण्याचे शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही या व्हिडीओच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळत आहे.

फडणवीस यांनी ट्वीट केले आहे की, ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!’ तसेच ‘आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !’ असे दुसरे ट्वीटही फडणवीस यांनी केले आहे.

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या.

सलग ३० वर्ष बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असे संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर
जुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? आरबीआयने दिली महत्वाची माहिती
आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु; पुन्हा एकदा नोटबंदी?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.