Devendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….

Devendra Fadanvis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना केली होती. या पत्रावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय घेऊन शकत नाही. त्यांच्या पत्रावर विचार करण्यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागले. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि उमेदवार दिलाही आहे, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली त्या त्या वेळी आम्ही ती भूमीकादेखील घेतली आहे. पण आता या स्टेजला जर काही भूमिका असेल तर ती मला घेता येत नाही. त्यामुळे आमच्या पक्षात यासंदर्भात चर्चा करावी लागेल, असे ते म्हणाले आहेत.

मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेनादेखील आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशीसुद्धा मला चर्चा करावी लागेल. ही चर्चा झाल्यानंतरच या पत्राच्या संदर्भात मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने ते पत्र पाठवलेलं आहे. आम्ही जरूर त्या पत्राचा सिरिअसली विचार करू. परंतु, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मात्र चर्चेअंतीच आम्हाला घेता येईल, त्याशिवाय घेता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, असे राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या
Mumbai Election: मुंबईच्या महापालिका निवडणूकीसाठी शिवसेनेने आखलाय मास्टर प्लॅन; अखिलेश-तेजस्वी सुद्धा देणार साथ?
Andheri By-Election : भाजपचा नववी पास उमेदवार निघाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक, लटकेंकडे किती संपत्ती?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; सेनेला पाठिंबा देत फडणवीसांनाही केली ‘ही’ विनंती
Raj Thackeray : मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र; लटके बिनविरोध निवडून येणार?