गाण्यावरून पत्नीवर होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही संयम बाळगतो, पण…

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा शिवसेनेवर टीका करत असतात. राज्यात कंगना, अर्णब, मेट्रो कार शेड यावरून त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

यावरून सतत शिवसेना नेतेही त्यांच्यावर टीका करत असतात. आता यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जात आहे. त्याबद्दल बोलायचे झाल्यास आम्ही कोणाच्याही घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो.

घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचे झाले तर याचे सर्वांत मोठ उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय लिहितात, काय बोलतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण मी त्याचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन, असा पलटवार त्यांनी केला आहे.

अमृता फडणवीस यांचे दिवाळीत एक गाणे आले होते, यावरून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्या देखील शिवसेनेवर सतत टीका करत असतात. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेले, तर त्यांनाही कुटुंब आहेत, असा इशारा दिला होता.

राज्यात भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जाते. यामध्ये अमृता फडणवीस या देखील सक्रिय असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.