Share

Devendra Fadanvis : ‘अभी नही तो कभी नही’ या आवेशाने लढायचं, मुंबईवर भाजपचेच वर्चस्व पाहीजे; फडणवीसांचा आदेश

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाचे निमित्त साधत मुंबई दौऱ्याला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ही बैठक मुंबई महानगरपालिके संदर्भात होती.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, “२०१४ मध्ये फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात धोका सहन करु नका. जे धोका देतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईच्या राजकारणात भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे. शिवसेना पक्ष छोटा झाला याला तुम्हीच जबाबदार आहात,” असे म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

पुढे ते म्हणाले की, मोदींच्या आणि फडणवीसांच्या नावावर मतं मागून तुम्ही जिंकला आणि आमचा विश्वासघात केला. मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. महाराष्ट्रात सुरु असलेले हिंदुविरोधी राजकारण बंद झाले पाहीजे. यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले पाहीजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असे ते म्हणाले.

तसेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले.

यासोबतच उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या बैठकीत मार्गदर्शन केले. “अभी नही तो कभी नही, या आवेशाने लढायचं,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच काहीही करून मुंबई पालिकेवर भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
सावंतांकडून शिवसेनेला भलं मोठं भगदाड; हजारो कार्यकर्ते-पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, थेट उद्धव ठाकरेंना धक्का
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
‘मेरे कार्यकर्ता आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता, भानगड की तो…’ शिंदे गटाचा ठाकरें इशारा
   

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now